पाळीव श्वानाच्या आक्रमणात महिला गंभीर घायाळ !
उल्हासनगर – येथे पाळीव श्वानाने शेजारच्या महिलेवर आक्रमण करून तिला गंभीर घायाळ केले. पीडित महिलेने तक्रार केल्यावर पोलिसांनी श्वान मालक महेश पुनवाणी यांच्यावर गुन्हा नोंदवला.
जेसीबीत बसून गर्भवतीने ओलांडला नाला !
गडचिरोली – येथे मुसळधार पावसामुळे नाल्यांना पूर आल्याने जेसीबी यंत्राच्या खोर्यात बसून एका गर्भवती महिलेला नाला ओलांडावा लागला. नाला पार करून रुग्णवाहिका नेता येणार नसल्याने असा उपाय काढावा लागला. नाला ओलांडल्यानंतर गर्भवतीला दुसर्या रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. (स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही रस्त्यांसारखी प्राथमिक सुविधा उपलब्ध नसणे दुर्दैवी ! – संपादक)
निवडणूक लढवणार्या थकबाकीदारावर गुन्हा नोंद !
बारामती – थकबाकीदार असतांनाही दोन संस्थांची निवडणूक लढवल्यावरून बारामती शहर पोलीस ठाण्यात कृष्णाजी उपाख्य कालिदास आनंदराव गावडे यांच्या तक्रारीवरून विनायक महादेव गावडे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
छातीत गोळ्या घालून तरुणाची हत्या !
छत्रपती संभाजीनगर – येथे छातीत गोळ्या घालून कपिल पिंपळे या तरुणाची हत्या करण्यात आली. यामागील कारण अस्पष्ट आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
संपादकीय भूमिका : कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !
असोला (हिंगोली) येथे गोळीबारात एक घायाळ
हिंगोली – औंढा नागनाथ तालुक्यातील आसोला येथील एका तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. गोळीबारानंतर जमलेल्या जमावाने आरोपीच्या घरावर दगडफेक करून मोटरसायकल वाहन जाळले आहे.
संपादकीय भूमिका : अशा प्रकारे गोळीबार होण्यास ही काय अमेरिका आहे का ?
अंबरनाथ (जिल्हा ठाणे) येथे ११ वर्षीय मुलीवर बलात्कार
अंबरनाथ (जिल्हा ठाणे) – येथे रस्त्याने पायी जाणार्या एका ११ वर्षीय मुलीला फसवून रिक्शात घेऊन जात तिच्यावर अल्पवयीन असलेल्या एका मुलाने बलात्कार केला. या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता यातील नवीन कलमासह पोक्सो कलमानुसार गुन्हा नोंद करत कारवाई केली आहे. यात एकूण ६ जणांना अटक केली आहे. यातील ४ अल्पवयीन असून इतर २ आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मोहाळी (चंद्रपूर) येथे बिबट्याचे ६ जणांवर आक्रमण !
चंद्रपूर – मोहाळी गावात घुसून २ बछड्यांसह मादी बिबट्याने गावात घुसून ६ जणांवर आक्रमण केले. त्यानंतर ते शानबा बारेकर यांच्या घरात जाऊन बसले. १९ जुलै या दिवशी पहाटे ६ वाजताच्या सुमारास गावात शिरले. या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी बचाव पथकासह बिबट्यांना पकडण्यासाठी आले.