Chhattisgarh Naxal Attack : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या आक्रमणात २ सैनिकांना वीरमरण, तर ४ सैनिक घायाळ

वीरमरण आलेले सैनिक

जगदलपूर (छत्तीसगड) – छत्तीसगड राज्यातील विजापूरच्या तर्रेम येथे झालेल्या बाँबस्फोटात २ सैनिक वीरगतीला प्राप्त झाले, तर ४ सैनिक घायाळ झाले. हे सैनिक नक्षलवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी जात असतांना रस्त्यामध्ये पेरून ठेवलेल्या बाँबचा स्फोट झाला. भरत साहू आणि सत्येर सिंग कांगे अशी वीरगतीला प्राप्त झालेल्या  सैनिकांची नावे आहेत. पुरुषोत्तम नाग, कोमल यादव, सियाराम सोरी आणि संजय कुमार हे सैनिक घायाळ झाले आहेत. त्यांना हेलिकॉप्टरने रायपूरला आणण्यात येणार आहे.