सावंतवाडी – आंबोली येथील घाटात पूर्वी दरड कोसळलेल्या जागेपासून काही अंतरावर एक मोठा दगड १७ जुलै दिवशी सकाळी थेट रस्त्यावर कोसळला. सुदैवाने या वेळी त्या ठिकाणी कोणतेही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला. वाहनचालकांनी याची माहिती आंबोली येथील पोलीस दूरक्षेत्रात दिली. त्यानंतर पोलिसांनी याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती दिल्यानंतर दुपारी जेसीबीच्या साहाय्याने हा दगड हटवण्यात आला आहे. सध्या या भागातून वाहतूक सुरळीत चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.