फळाची अपेक्षा सोडून कर्म केल्यास मनाला समाधान प्राप्त होते !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

कर्माला प्रारंभ करतांना फळ मिळते किंवा नाही म्हणून काळजी आणि दु:ख होते. कर्म करत असतांना फळाकडे चित्त लागल्याने कर्माचे कष्ट होतात म्हणून दु:ख होते. कर्म संपून फळ मिळाले नाही, तर दुःख होते आणि फळ मिळालेच, तर त्यातून नवीन आशा उत्पन्न होऊन फळ मिळाल्याचा आनंद ती मारते. फळाची अपेक्षा सोडून कर्म करू लागलो की, ते कर्म करत असतांनाच मनाला समाधान प्राप्त होते. म्हणून ‘परमार्थामध्ये रोकडा (रोखीचा) व्यवहार आहे, उधारीचा नाही’, असे सर्व संतांचे सांगणे आहे. अधिक वाचू नका. जे काही थोडे वाचाल, त्याचे मनन करा आणि ते कृतीत आणा !

– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

(‘पू. (प्रा.) के.व्ही. बेलसरे आध्यात्मिक साहित्य’ यांच्या फेसबुकवरून साभार)