वेन्स यांची पत्नी आहे भारतीय !
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी ओहायोचे खासदार (सिनेटर) जेडी वेन्स यांची उपराष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. जेडी वेन्स अवघे ३९ वर्षांचे आहेत. वेन्स हे वर्ष २०२२ मध्ये ते सिनेटवर पहिल्यांदा निवडून आले होते. त्याआधी ते अमेरिकेच्या नौदलात सैनिक म्हणून इराकमध्ये सेवारत होते. त्यांनी कायद्याचेही शिक्षण घेतले आहे. विशेष म्हणजे वेन्स आणि ट्रम्प यांच्यात वाद होता. वेन्स यांनी ट्रम्प यांना ‘हिटलर’ असेही संबोधले होते. जेडी वेन्स यांच्या पत्नी भारतीय आहेत. उषा चिलुकुरी असे त्यांच्या पत्नीचे नाव असून त्या मूळच्या आंध्रप्रदेशातील रहिवासी आहेत. वेन्स आणि उषा यांनी एकत्रितपणे कायद्याचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. वर्ष २०१४ मध्ये हिंदु पद्धतीनुसा त्यांचा विवाह झाला. त्यांना इवान, विवेक आणि मीराबेल, ही ३ मुले आहेत.