पंढरपूर – आषाढी वारीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १४ जुलैला सोलापूर जिल्ह्याच्या दौर्यावर होते. मुख्यमंत्र्यांनी करकंब येथे श्री संत निळोबाराय यांच्या पालखीचे दर्शन घेतले आणि पालखीसमवेत काही वेळ चालले. या वेळी शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले उपस्थित होते. सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर येथे आषाढी वारीच्या सिद्धतेची पहाणी करून आढावा घेतला.