देवाच्या दागिन्यांची डिजिटल स्वरूपात सूची करण्यासाठी मोहीम
पुरी (ओडिशा) – जगप्रसिद्ध जगन्नाथ मंदिराचा रत्नभंडार १४ जुलैच्या दुपारी १ वाजून २८ मिनिटांनी उघडण्यात आला. या वेळी सरकारचे प्रतिनिधी, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी आणि श्री गजपती महाराजांचे प्रतिनिधी असे ११ जण उपस्थित होते. याआधी वर्ष १९७८ मध्ये मंदिराचे रत्नभंडार उघडण्यात आले होते.
१. सरकारने रत्नभंडारातील मौल्यवान वस्तूंची डिजिटल सूची बनवण्याचा निर्णय घेतला आहे. यांतर्गत त्यांचे वजन आणि प्रकार आदींचा तपशील असेल.
२. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक डी.बी. गडनायक यांनी सांगितले की, अभियंते रत्नभंडाराचे सर्वेक्षण करणार आहेत.
३. तिजोरीतील मौल्यवान वस्तूंचा मागोवा ठेवण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती विश्वनाथ रथ यांनी सांगितले की, मंदिर प्रशासनाचे मुख्य प्रशासक अरबिंदा पाधी यांनी तिजोरी उघडण्याचे नेतृत्व केले.
४. या वेळी दागदागिने ठेवण्यासाठी ६ लाकडी तिजोर्या आणण्यात आल्या. एकेक तिजोरी उचलण्यासाठी ८-१० लोक लागत होते.