रायगडावर ढगफुटीसदृश पाऊस !

गडाच्‍या पायर्‍यांवरून धबधब्‍यासारखे पाणी आले

रायगड – रायगडावर ढगफुटीसदृश पाऊस पडला. तेथील महादरवाज्‍यातून पाण्‍याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वहात होता. सर्वांना पाण्‍याचे रौद्र रूपच पहायला मिळाले. या सर्वांत तेथे पर्यटनासाठी आलेले काही शिवप्रेमी थोडक्‍यात वाचले. गडाच्‍या पायर्‍यांवरून धबधब्‍यासारखे पाणी येत असल्‍याने त्‍यावरून खाली उतरणेही कठीण झाले होते. ३१ जुलैपर्यंत रायगड पर्यटनासाठी बंद ठेवण्‍यात आला आहे.

ढगफुटी म्‍हणजे काय ?

ढगफुटी म्‍हणजे ढग, जे अतिरिक्‍त भार घेऊन मार्गक्रमण करतात. त्‍यांच्‍या मार्गात एखादा डोंगर आल्‍यास त्‍यावर ते आदळून फुटतात. त्‍यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.