‘षोडश नित्य देवीयंत्रा’चे पूजन करत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. ‘१८.६.२०२४ या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘षोडश नित्य देवीयंत्रा’चे पूजन करत होत्या. त्या यंत्राला पुष्प अर्पण करत असतांना ‘त्रिपुरसुंदरीदेवी भव्य रूपात तेथे उपस्थित आहे आणि तिच्या दोन्ही बाजूंना १६ देवी उपस्थित आहेत’, असे मला जाणवत होते.

सौ. क्षिप्रा जुवेकर

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ एकेक पुष्प यंत्रावर अर्पण करत होत्या. त्या वेळी मला जाणवले, ‘प्रत्येक पुष्प प्रत्येक देवी स्वीकारत आहे आणि ती ती देवी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या देहात प्रवेश करत आहे. शेवटी त्रिपुरसुंदरादेवीही त्यांच्यामध्ये सामावली आहे.’

३. संपूर्ण पूजाविधीच्या वेळी माझे मन शांत आणि आनंदी होते.

४. ‘गुरुकृपेमुळेच मला हा दैवी क्षण अनुभवण्याची संधी मिळाली’, याबद्दल मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.’

– सौ. क्षिप्रा प्रशांत जुवेकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ४० वर्षे), जळगाव (२०.६.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक