दुचाकीस्वाराच्या माध्यमातून अनिष्ट शक्तीने आक्रमण करणे आणि गुरुदेवांच्या कृपेने सद्गुरु स्वाती खाडये अन् साधक मोठ्या संकटातून वाचणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सद्गुरु स्वाती खाडये प्रवास करत असलेल्या चारचाकी गाडीला मद्यप्राशन केलेल्या दुचाकीस्वाराने ‘ओव्हरटेक’ करण्याचा प्रयत्न करणे

सद्गुरू स्वाती खाड्ये

‘१५.५.२०२४ या दिवशी आम्ही चारचाकी गाडीने प्रवास करत होतो. मार्गात एका चौकात मद्यप्राशन केलेला एक दुचाकीस्वार आमच्या गाडीच्या चालकाच्या बाजूने पुढे जाण्याचा (‘ओव्हरटेक’ करण्याचा) प्रयत्न करत होता. या वेळी आमच्या गाडीच्या डाव्या बाजूने अन्य वाहने जात असल्याने आम्हाला त्या दुचाकीस्वाराला पुढे जाण्यासाठी मार्ग देता येत नव्हता. त्या दुचाकीस्वाराला आमचा राग आला.

२. दुचाकीस्वाराने चारचाकी गाडी आणि सद्गुरु अन् साधक यांना हानी पोचवण्याच्या केलेल्या प्रयत्नांत गाडीच्या पुढच्या बाजूची काच फुटणे

तो आमच्या गाडीचा पाठलाग करत होता. पुढे एका ‘सिग्नल’च्या ठिकाणी आमची गाडी थांबल्यावर त्याने दुचाकी गाडी आमच्या वाहनासमोर आडवी लावली आणि तो माझ्या बाजूच्या दाराच्या काचेवर हात मारू लागला. त्याला काहीच करता येईना; म्हणून त्याने चालकाच्या बाजूला जाऊन गाडीचा आरसा तोडण्याचा प्रयत्न केला; मात्र तेथेही काही करता न आल्याने रागावून त्याने गाडीच्या समोरील काचेवर (विंड ग्लासवर) हाताची मूठ जोरात मारली. त्यामुळे गाडीची काच फुटली. आजूबाजूचे लोक त्याला सांगत होते, ‘‘यांची काहीच चूक नाही’’, तरीही तो ऐकत नव्हता. ‘सिग्नल’ चालू होताच तो पळून गेला.

३. दुचाकीस्वाराने केलेल्या गाडीच्या हानीची छायाचित्रे पहातांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना झालेला त्रास

‘त्या दुचाकीस्वाराच्या माध्यमातून अनिष्ट शक्ती आम्हाला त्रास देत आहे’, असे मला जाणवत होते. त्या दुचाकीस्वाराने केलेल्या गाडीच्या हानीची छायाचित्रे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी पाहिल्यानंतर त्या म्हणाल्या, ‘‘एक अनिष्ट शक्ती त्यांना खेचत आहे’, असे मला दिसले.’’ ते आमच्यावरील मोठे आक्रमण होते. केवळ गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने आम्ही वाचलो.’’

– सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था. (१९.५.२०२४)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक