Apna Dal S leader Dead : प्रयागराज येथे भूमीच्या वादातून ‘अपना दल’ पक्षाच्या नेत्याची  हत्या !

अपना दल (एस्) पक्षाचे नेते इंद्रजित उपाख्य मोनू पटेल

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथे अपना दल (एस्) पक्षाचे नेते इंद्रजित उपाख्य मोनू पटेल (वय २४ वर्षे) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सकाळी ते घराबाहेर पडताच शेजारी रहाणार्‍या सर्वेश (वय २८ वर्षे) याने त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. पटेल उच्च न्यायालयात अधिवक्ताही होते. पोलिसांनी सर्वेश याला अटक केली आहे. सर्वेश याने सांगितले की, माझ्या कुटुंबातील वडीलधार्‍यांनी इंद्रजितच्या कुटुंबाला भूमी दान केली होती. आता आम्ही काही भूमी परत मागत होतो; पण इंद्रजित ती देत नव्हता.