Kulgam Terrorist Encounter : जम्मू-काश्मीरमध्ये ६ आतंकवादी ठार; तर २ सैनिक वीरगतीला प्राप्त

ठार झालेले आतंकवादी

कुलगाम (जम्मू-काश्मीर) – येथे जिहादी आतंकवाद्यांशी झालेल्या २ चकमकींमध्ये ६ आतंकवादी ठार झाले, तर २ सैनिकांना वीरगती प्राप्त झाली. ६ जुलैच्या दुपारी मोदरगाम येथे झालेल्या चकमकीत ४ आतंकवादी ठार झाले होते, तर सायंकाळी फ्रिसल येथे झालेल्या चकमकीत २ आतंकवादी ठार झाले.

२ सैनिक वीरगतीला प्राप्त

पहिल्या चकमकीत महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील २४ वर्षीय सैनिक प्रवीण जंजाळ यांना वीरगती प्राप्त झाली. येथे शोधमोहीम चालू असतांना ही चकमक झाली.

संपादकीय भूमिका

जोपर्यंत आतंकवाद्यांचा कारखाना असणार्‍या पाकिस्तानला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद संपणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे आणि मुळावरच घाव घालायला हवा !