Jagannath Chariot Firing : इंफाळ (मणीपूर) येथे भगवान जगन्‍नाथाच्‍या यात्रेसाठी बनवण्‍यात येणार्‍या रथावर अज्ञातांकडून गोळीबार !

भगवान जगन्‍नाथाच्‍या यात्रेसाठी बनवण्‍यात येणार्‍या या रथावर अज्ञातांकडून गोळीबार

इंफाळ (मणीपूर) – येथे ४ जुलैच्‍या रात्री भगवान जगन्‍नाथाच्‍या यात्रेसाठी बनवण्‍यात येणार्‍या रथावर अज्ञातांनी गोळीबार केला आणि पलायन केले. ही घटना इंफाळमधील साना कोनुंगजवळ घडली. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलीस या घटनेचे अन्‍वेषण करत आहेत. ८ जुलै या दिवशी रथयात्रा निघणार आहे. त्‍यासाठी हा रथ बनवण्‍यात येत आहे. रथावर गोळीबार करण्‍यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.

इंफाळमधील ही रथयात्रा राज्‍याच्‍या महत्त्वाच्‍या उत्‍सवांपैकी एक आहे. हा उत्‍सव १० दिवस चालतो. ही रथयात्रा ओडिशातील पुरी येथील जगन्‍नाथ रथयात्रेसारखीच आहे.

या रथयात्रेत भगवान जगन्‍नाथ, बलभद्र आणि सुभद्रा रथावर विराजमान असतात. हा रथ सुमारे २० फूट उंच असून भाविक हाताने खेचतात.

संपादकीय भूमिका

मणीपूरमध्‍ये गेल्‍या दीड वर्षांहून अधिक काळ मैतेई हिंदु आणि कुकी ख्रिस्‍ती यांच्‍यात चालू असलेल्‍या हिंसाचारामुळेच ही घटना घडल्‍याचा संशय येतो !