वैद्या (कु.) अपर्णा महांगडे : परम पूज्य, सद्गुरु पिंगळेकाकांनी (सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी) आम्हाला सांगितले होते, ‘‘तुम्ही साधकांचा केवळ शारीरिक स्तरावर विचार करू नका. त्यांच्या मानसिक आणि आध्यात्मिक भागाकडेही पहा.’’ त्यांनी सांगितल्यापासून आम्ही साधकांची तपासणी करतांना देवाला तशी प्रार्थना करतो. देव तोही भाग आमच्या लक्षात आणून देत आहे. त्यानुसार आम्ही त्या साधकाला सांगतो, ‘‘तुमचा हा भाग न्यून पडतो, तुम्ही त्यावरही प्रयत्न करा.’’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : आध्यात्मिक भाग वाटला, तर नामजप इत्यादी करायला सांगता का ? सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजप विचारायला सांगता का ?
वैद्या (कु.) अपर्णा महांगडे : हो.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : चांगले झाले. आता वैद्यकी (डॉक्टरी) केवळ रुग्णाच्या शरिराची नाही, मन आणि अध्यात्म (आध्यात्मिक स्थिती) यांचीही ! मग आता लवकर पुढे जाणार. छान आहे. सगळ्याच वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल कॉलेजमध्ये) वैद्यांना (डॉक्टरांना) हे शिकवले पाहिजे ना ! नुसती स्टेथोस्कोपने (stethoscope) शारीरिक तपासणी नको.