Israel : आमच्याकडे सर्वनाश घडवून आणणारी शस्त्रे आहेत ! – इस्रायल

इस्रायलची मध्य-पूर्वेतील इस्लामी देशांना चेतावणी

तेल अविव (इस्रायल) – जर आम्हाला असे वाटत असेल की, आमच्या अस्तित्वाला धोका आहे आणि इराण, येमेन, सीरिया, तसेच मध्य-पूर्वेतील सर्व देशांनी आमच्या विरोधात युद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे, तर आमच्याकडे सर्वनाश घडवून आणणारी शस्त्रेे आहेत, अशी चेतावणी ‘इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रिज वर्कर कौन्सिल’चे अध्यक्ष यायर कात्झ यांनी दिली.

१. संयुक्त राष्ट्रांमधील इराणच्या राजदूताने इस्रायलला उघडपणे धमकी दिल्याच्या एका दिवसानंतर कात्झ यांनी हे विधान केले. इराणच्या राजदूताने एक्सवर पोस्ट करत लिहिले की, जर इस्रायलने पूर्ण शक्तीनिशी लेबनॉनवर आक्रमण केले, तर विनाशकारी चालू होईल.

२. यावर कात्झ यांनी उघड केले की, अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनी हे देश इस्रायलला धोक्यात आणू शकणार्‍या हालचाली कुठे चालू आहेत ?, याची माहिती देऊन साहाय्यही करतात.