पुरवठादाराला काळ्या सूचीत टाकण्याची मागणी
नागपूर – येथील पारशिवनी तालुक्यात घाटरोहणा ग्रामपंचायतीच्या सीमेतील अंगणवाडीत देण्यात येणार्या पोषण आहारात मृत पक्षी आढळला आहे. (विद्यार्थ्यांना आहार देण्यापूर्वी त्याची पहाणी किंवा पडताळणी केली जात नाही का ? – संपादक) यावर लहान मुलांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार देत असल्याचा आरोप करत सरपंच आणि गावकरी यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना निवेदन दिले. या प्रकरणी पुरवठादारावर कठोर कारवाई करण्यासह त्याला काळ्या सूचीत टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाविद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणार्यांना कठोर शिक्षाच व्हायला हवी ! |