अनेक थोर संत-महात्म्यांच्या अथक प्रयत्नांमुळे वर्ष २००६ पासून चालू असलेला माझा महामृत्यूयोग वेळोवेळी टळून मला नवजीवन लाभत आहे ! – परात्पर गुरु डॉ. आठवले
१. ‘हिंदु राष्ट्राची स्थापना आणि पुढील सर्व कार्याची व्यवस्था करून आपल्याला जायचे आहे’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगणारे देहलीतील पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन !
परात्पर गुरु डॉ. आठवले : ‘१० वर्षांपासून माझा महामृत्यूयोग चालू आहे.
पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन : आता आपल्याला जिवंत रहायला हवे; कारण हिंदु राष्ट्राची निर्मिती करूनच आपल्याला जायचे आहे. ‘हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, असा आपला संकल्प आहे. तो पूर्ण करूनच आपल्याला जायचे आहे. त्यापूर्वी नाही. आपल्याला हिंदु राष्ट्राची स्थापना आणि पुढील सर्व कार्याची व्यवस्थाही करायची आहे. नाहीतर हिंदु राष्ट्र आले; पण नंतर ‘त्याचा कधी दुरुपयोग केला गेला’, हे कळणारही नाही. असे झाले, तर सर्व प्रयत्न वाया जातील.
परात्पर गुरु डॉ. आठवले : हिंदु राष्ट्र चालवण्यासाठी आता नवीन पिढी सिद्ध आहे ना !
पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन : नाही. हे कार्य नवीन पिढ्यांवर सोडून द्यायला नको. आपल्याला आपल्याच देखरेखीखाली सर्व काही करायचे आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी अनेक संतही प्रयत्न करत आहेत. वर्ष २००६ पासून माझा महामृत्यूयोग चालू आहे; पण संतांमुळेच मी जिवंत आहे. संतसुद्धा म्हणतात, ‘‘आपल्याला जिवंत रहायचे आहे. हे कार्य होण्यासाठी आपले अस्तित्व आवश्यक आहे.’’
(क्रमश:)