‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

२४ ते ३० जून २०२४ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ चालू आहे. या अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट देऊन येथील कार्याची ओळख करून घेत आहेत.

डावीकडून जयपूर येथील संस्कृती युवा संस्थेच्या सचिव सौ. नीलम सुरेश मिश्रा, संस्कृती युवा संस्थेचे अध्यक्ष पंडित सुरेश मिश्रा यांना आश्रमातील ध्यानमंदिरातील देवतांची माहिती सांगतांना साधक श्री. रोहित साळुंके
डावीकडून फुलेरा, राजस्थान येथील संस्कार सेवा योजना ट्रस्टचे संस्थापक श्री. विनोद प्रजापति, जयपूर येथील गायत्री परिवाराचे संघटन प्रभारी श्री. रामराय शर्मा आणि जयपूर, राजस्थान येथील निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर नर्मदा शंकरपुरीजी महाराज यांना सात्त्विक कलाकृतींची माहिती देतांना साधक श्री. निषाद देशमुख