वसई येथील पोकलेन दुर्घटना प्रकरण
ठाणे – वसईतील वर्सोवा येथे सूर्या प्रकल्पाचे काम चालू आहे. तेथे ५० फूट खोल खड्ड्यात पोकलेन काम करत असतांना त्यावर सिमेंटचा गर्डर कोसळून दुर्घटना झाली होती. त्याला २५ दिवस होऊनही जेसीबीचा चालक राकेश यादव बेपत्ता आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी सर्व प्रकारचे साहाय्य करण्यात येत आहे; मात्र त्यांचा शोध लागलेला नाही. एल् अँड टी आस्थापनाच्या वतीने ३५ लाख रुपये, तर १५ लाख विम्याचे असा ५० लाख रुपयांचा धनादेश यादव यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला, तसेच राकेशचा भाऊ दुर्गेश याला एल् अँड टी आस्थापनात नोकरीही देण्यात आली आहे.