हिंदु धर्मशास्त्रानुसार प्रत्येक जिवाच्या प्रत्येक जन्माचे त्याच्या प्रारब्धानुसार नियोजन झालेले असते

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘हिंदु धर्मशास्त्रानुसार प्रत्येक जिवाच्या प्रत्येक जन्माचे त्याच्या प्रारब्धानुसार नियोजन झालेले असते, उदा. एखाद्या जन्मात त्याच्या सोबत कोण असणार ? त्या जन्मात त्याचे आयुष्य किती असणार ?  इत्यादि. त्यामुळे प्रत्येकाचे त्या त्या जन्मातील आयुष्य मर्यादित असते. एखाद्याचा मृत्यू जवळ आल्यामुळे त्याचे कुटुंबीय त्याच्यासाठी प्रार्थना करतात; पण ईश्वर कधीही आयुष्य वाढवून देत नाही; कारण त्याने त्या व्यक्तीचे पुढील जीवन ठरवलेले असते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले