राज्य सरकारने केलेल्या सर्वच मोठ्या खर्चाच्या प्रकल्पांचे अन्वेषण व्हावे ! – खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

सुप्रिया सुळे

पुणे – अटल सेतूला पडलेल्या भेगा पाहिल्यानंतर या सेतूच्या कामाचे नाही, तर राज्य सरकारने केलेल्या सर्व मोठ्या खर्चाच्या प्रकल्पांचे अन्वेषण व्हावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. खासदार म्हणून विजयी झाल्यानंतर सुळे यांनी पक्ष कार्यालयाला प्रथमच भेट दिली. त्या वेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. अटल सेतूचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. सरकारने घाईने कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प केले, त्याचाच हा परिणाम आहे. राज्यात पेपरफुटीच्या घटना घडत आहेत. बेरोजगारांना काम मिळत नाही. महिलांवर अत्याचार होत आहेत. मुलींना विनामूल्य शिक्षण ही निवडणुकीपूर्वी केलेली घोषणा हवेतच विरली आहे. राज्यातील जातीय संघर्षालाही हेच सरकार उत्तरदायी आहे, असेही त्या म्हणाल्या.

संपादकीय भूमिका

शरदचंद्र पवार गटाचे नेतेही भ्रष्टाचारात पुढे आहेत, त्याबद्दल सुळे यांनी कधी अवाक्षरही काढले नाही.