ठाणे येथे ‘सेक्स रॅकेट’ चालवणार्‍या विदेशी दलाल महिलेला अटक !

ठाणे, २४ जून (वार्ता.) – वागळे इस्टेट भागातील लुईसवाडी येथील सेवारस्त्यालगत असलेल्या विटस् शरणम हॉटेलमध्ये काही विदेशी तरुणींकडून शरीरविक्रीचा व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तेथे सापळा रचून देहविक्री व्यवसाय (सेक्स रॅकेट) चालवणार्‍या विदेशी दलाल महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या ‘अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागा’ने अटक केली आहे. (कायद्याचे भय वाटत नसल्यामुळेच गुन्हेगार असे गुन्हे करण्याचे धाडस करत आहेत. – संपादक) तिच्या तावडीतून ३० ते ३५ वयोगटातील थायलंड येथील ३ पीडित महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणी दलाल आरोपी महिलेविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.