केंद्र सरकारचा नवीन नियम
नवी देहली – कार्यालयांमध्ये उशिरा येणार्या कर्मचार्यांविषयी केंद्र सरकारने नवीन नियम लागू केला आहे. जर एखादा कर्मचारी कार्यालयात उशिरा पोचला, तर त्याचा कामाचा केवळ अर्धा दिवस मोजला जाईल, म्हणजेच त्याला अर्ध्या प्रासंगिक रजेसाठी अर्ज करावा लागणार आहे. जनतेकडून आलेल्या तक्रारी लक्षात घेऊन केंद्राने हा नियम लागू केला आहे.
केंद्र सरकारने कर्मचार्यांना कार्यालयीन वेळेत १५ मिनिटांची सूट दिली आहे. यापेक्षा अधिक विलंब झाल्यास तोे अर्धा दिवस म्हणून गणला जाईल.
संपादकीय भूमिकाअनेक दशके असा प्रकार चालू असतांना आता हा निर्णय घेतला गेला, हेही नसे थोडके ! आता याच प्रमाणे मतदारसंघात काम न करणारे, संसदेत उपस्थित न रहाणारे, संसदेत उशिरा येणारे खासदार, तसेच मंत्री यांच्यावरही कारवाई केली पाहिजे ! |