Pakistan Minority Hindus : पाकच्‍या खैबर पख्‍तुनख्‍वा प्रांतातून हिंदू आणि शीख यांचे पलायन !

इस्‍लामाबाद (पाकिस्‍तान) – पाकच्‍या अशांत खैबर पख्‍तूनख्‍वा प्रांतातील अल्‍पसंख्‍यांकांची अनेक कुटुंबे बिघडलेल्‍या सुरक्षा परिस्‍थितीमुळे देशाच्‍या इतर भागांत किंवा परदेशात पळून गेली आहेत. एका हिंदु कार्यकर्त्‍याने ही माहिती दिली आहे. अफगाणिस्‍तानच्‍या सीमेला लागून असलेल्‍या खैबर पख्‍तुनख्‍वा प्रांतात या वर्षाच्‍या एप्रिल अखेरपर्यंत आतंकवादाशी संबंधित किमान १७९ घटना घडल्‍या आहेत.

१. पाकिस्‍तान हिंदु मंदिर व्‍यवस्‍थापन समितीचे हारून सरबदियाल म्‍हणाले की, हिंदु, शीख आणि ख्रिस्‍ती कुटुंबे बहुतेक पंजाब आणि सिंध प्रांतात गेली, तर काही परदेशात गेली.
प्रांतातील बिघडलेल्‍या कायदा आणि सुव्‍यवस्‍थेमुळे हिंदु अन् शीख व्‍यापार्‍यांना त्‍यांची वडिलोपार्जित घरे सोडून जाणे भाग पाडले आहे. आदिवासी भाग, पेशावर, स्‍वात आणि काही डोंगराळ भागांतील बहुतेक हिंदु आणि शीख यांनी त्‍यांचे वडिलोपार्जित क्षेत्र सोडले आहे.

२. गेल्‍या काही वर्षांत या प्रांतात लक्ष्यित हत्‍येच्‍या (टार्गेट किलिंगच्‍या) घटना वाढल्‍या आहेत. यामुळे अनेक शीख कुटुंबांनी पेशावरमधील सर्वांत जुन्‍या शीख वस्‍त्‍यांपैकी एक असलेला मोहल्ला जोगन शाह सोडला. या भागात ऐतिहासिक गुरुद्वारा आणि शीख समुदायाची शाळा आहे. मोहल्ला जोगन शाहमध्‍ये सुमारे ६ सहस्र शीख रहात होते.

३. येथील रहिवासी प्रदीप सिंह म्‍हणाले की, आमचे पूर्वज रहात होते, ते हे क्षेत्र आहे. येथे आम्‍ही आमची संस्‍कृती, परंपरा आणि आमची शैक्षणिक व्‍यवस्‍था जपली आहे.

संपादकीय भूमिका

भारत असो कि पाकिस्‍तान हिंदूंना धर्मांध मुसलमानांमुळे पलायन करण्‍यास भाग पडते, हा गेल्‍या १ सहस्र वर्षांचा अनुभव आहे. ही स्‍थिती पालटण्‍यासाठी भारताला हिंदु राष्‍ट्र घोषित करणे आवश्‍यक आहे !