चीनने २ सामाजिक कार्यकर्त्यांना कारागृहात टाकले : अमेरिकेकडून तात्काळ सुटकेची मागणी

वॉशिंग्टन – पत्रकार आणि महिला हक्क कार्यकर्त्या हुआंग झुकिन (सोफिया हुआंग), तसेच कामगारांच्या अधिकारांसाठी लढणारे वांग जियानबिंग यांना चुकीच्या पद्धतीने दोषी ठरवल्याविषयी अमेरिकेने चीनवर टीका केली आहे. तसेच चीनने या दोन्ही कार्यकर्त्यांची तात्काळ सुटका करावी, अशी मागणी अमेरिकेने केली आहे. चीन सरकारने झुकिन यांना ५ वर्षे, तर जियानबिंग यांना ३ वर्षे आणि ६ मासांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी म्हटले आहे की, झुकिन आणि जियानबिंग यांना अन्याय्य पद्धतीने कह्यात घेतल्याने त्यांना तात्काळ सोडले पाहिजे. चीन अशा पद्धतीने नागरिकांना धमकावण्याचा आणि गप्प करण्याचा सतत प्रयत्न करत असतो.

संपादकीय भूमिका

  • चीन अशा मागण्यांना केराची टोपली दाखवणार, हे उघड आहे !