नाम हे रूपापेक्षा व्यापक असते. रूप हे नामाहून निराळे राहू शकत नाही. नाम हे रूपाला व्यापून शेष उरते. नाम हे दृश्याच्या पलीकडे आणि सूक्ष्म असल्यामुळे त्याला उत्पत्ती विनाश, वाढ अन् घट, देश-काल-निमित्ताच्या मर्यादा इत्यादी कोणतेही विकार नाहीत. म्हणून नाम हे पूर्वी होते, आज आहे आणि पुढेही तसेच राहील. नाम हे सत्स्वरूप आहे. नामातून अनेक रूपे उत्पन्न होतात आणि अखेर त्याच्यामध्येच ती लीन होतात. शुद्ध परमात्मस्वरूपाच्या अगदी जवळ कुणी असेल, तर ते फक्त नामच होय. म्हणून नाम घेतल्यावर भगवंत आपल्याजवळ असल्यासारखाच आहे.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
(‘पू. (प्रा.) के.व्ही. बेलसरे आध्यात्मिक साहित्य’ यांच्या फेसबुकवरून साभार)