नाशिक येथे २ गोरक्षकांवर धर्मांधांचे आक्रमण !

नाशिक – शहरातील भद्रकाली परिसरात बेकायदेशीररित्‍या गोवंशियांच्‍या मांसाची विक्री चालू असतांना ती थांबवणारे श्रीकांत क्षत्रिय (वय ३८ वर्षे) आणि नीलेश गांगुर्डे (वय २३ वर्षे) यांच्‍यावर आक्रमण करण्‍यात आले. या प्रकरणात ते घायाळ झाले असून संशयितांविरुद्ध गुन्‍हा नोंदवण्‍याचे काम चालू आहे. या घटनेनंतर बजरंग दलाच्‍या कार्यकर्त्‍यांनी घायाळ झालेल्‍यांना भेटण्‍यासाठी जिल्‍हा रुग्‍णालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.

संपादकीय भूमिका

  • गोवंशहत्‍या बंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही तर होत नाहीच आणि गोवंशियांच्‍या हत्‍या रोखणार्‍यांवर आक्रमणे होतात, हे संतापजनक !
  • आक्रमणकर्त्‍या धर्मांधांवर पोलीस कठोर कारवाई कधी करणार ?