China On G7 : (म्हणे) ‘जी-७’ शिखर परिषदेत आम्हाला अपकीर्त केले गेले !’ – चीन

बीजिंग – दक्षिण इटलीतील अपुलिया शहरात पार पडलेल्या ‘जी-७’ (‘जी-७’म्हणजे अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, जर्मनी, इटली, जपान आणि फ्रान्स, या ७ देशांनी ,कत्र येऊन स्थापन केलेली परिषद) शिखर परिषदेत आम्हाला अपकीर्त करण्यात आले, असा आरोप चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी केला. ‘जी-७’ शिखर परिषदेत चीनवरील वक्तव्याविषयी लिन जियान यांनी पत्रकार परिषद घेतली.

लिन जियान म्हणाले, ‘‘जी-७’  शिखर परिषदेतील नेत्यांनी चीनचा निषेध केला. या परिषदेत चीनवर निराधार आरोप करण्यात आले. ‘जी-७’ गट हा काही जगाचे प्रतिनिधित्व करत नाही. या ७ देशांचा वाटा जगाच्या लोकसंख्येच्या केवळ १० टक्के आहे. जरी या सर्वांना एकत्र आणले, तरी जागतिक आर्थिक विकासात त्यांचे योगदान चीनच्या तुलनेत अल्प आहे. ‘जी-७’ परिषद ही दीर्घ काळापासून तिच्या ध्येयापासून दूर गेले आहे. अमेरिका आणि पाश्‍चात्य देश यांचे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी ती राजकीय शस्त्र बनली आहे.’’

संपादकीय भूमिका 

इटलीत नुकत्याच पार पडलेल्या ‘जी-७’ शिखर परिषदेत इटलीच्या पंतप्रधान जियोर्जिया मेलोनी यांनी भारत या परिषदेचा सदस्य नसूनही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केले होते. यामुळे चीनच्या पोटात दुखले नसेल कशावरून ?