Pakistan Terror : पाकिस्तानात मुलांना आतंकवादी बनवले जाते ! – सीमा हैदर

पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिचे मत

नोएडा (उत्तरप्रदेश) – पाकिस्तानमध्ये मुलांचे भविष्य नाही. तिथे शिकण्याऐवजी आतंकवादी बनण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या उलट भारतातील मुलांचे भविष्य अतिशय उज्ज्वल आहे, असे मत पाकिस्तानातून उत्तरप्रदेशातील नोएडा येथे आलेल्या सीमा हैदर या महिलेने व्यक्त केले. जम्मूमध्ये भाविकांवर झालेल्या आतंकवादी आक्रणाच्या पार्श्‍वभूमीवर तिने हे मत व्यक्त केले आहे. स्वतःच्या प्रियकराला भेटण्यासाठी ४ मुलांची आई असणार्‍या सीमा हैदर हिने भारतात बेकायदेशीररित्या प्रवेश केला होता. त्या वेळी ती प्रकाशझोतात आली होती.

सीमा हैदर पुढे म्हणाली की, भारतीय मुले अभियंता किंवा डॉक्टर बनतात. येथील लोक त्यांच्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करतात. पाकिस्तानात मात्र असे दिसून येत नाही.