शिराळा (जिल्हा सांगली) येथे ढगफुटीसदृश पावसामुळे शेतीची हानी !

अनेक नागरिकांच्या घरात पाणी !

सांगली, ९ जून (वार्ता.) – जिल्ह्यातील शिराळा उत्तर भागातील पणुंब्रे, घागरेवाडी, गिरजवडे, शिवरवाडी, भैरववाडी भागांत ८ जून या दिवशी सायंकाळी १ घंटा ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे ओढ्याचे पाणी अनेक शेतकर्‍यांच्या घरात आणि शेतात घुसून मोठी हानी झाली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दुपारपासूनच वीजपुरवठा खंडित झाला होता. परिसरातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरून हानी झाली आहे. पेरणीची कामे चालू असतांनाच असा ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.