‘वर्तमानकाळी भले कुणी धनवान असतील, उच्चासनावर, सिंहासनावर बसलेले असतील; परंतु ते धर्म, ते लोक, ती राज्ये अधिक काळापर्यंत टिकणार नाहीत, जर त्यांचा आधार त्याग आणि सत्यावर प्रतिष्ठित नसेल. ज्यांच्या हृदयात सखोल सत्यनिष्ठा आहे, त्याग आहे आणि जे अत्यल्प भौतिक सुविधांचा उपयोग करून अधिकाधिक अंतरात्म्याचे सुख घेत आहेत, त्यांच्याच विचारांनी मानवी जीवनाचे उत्थान केले आहे. जे अधिक भोगी आहेत, ते सुखसुविधांचे अधिक गुलाम आहेत. ते भले कधी सुखी, हर्षित दिसतील; परंतु आत्मसुखापासून ते लोक वंचित रहातात.’
(साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी’)