कर्नाटकच्या विधानसभेचे अध्यक्ष यु.टी. खादर यांचे भारत-पाक क्रिकेट सामान्यावर विधान !
मंगळुरू (कर्नाटक) – ‘टी-२० क्रिकेट विश्वचषक’ स्पर्धेत ९ जून या दिवशी अमेरिकेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. याविषयी कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष यु. टी. खादर म्हणाले की, भारताने पाकिस्तानशी क्रिकेट खेळूच नये. पाकिस्तानी येथे आले होते, तेव्हा त्यांना विरोध केलेला आपण पाहिला आहे. भारतात त्यांच्याविरुद्ध खेळणे बंद केले होते. तसे असेल, तर परदेशात त्यांच्याशी कशाला खेळायचे ? ते नीट वागत नाहीत, तोपर्यंत त्यांच्याशी खेळूच नये, असे माझे वैयक्तिक मत आहे.
खादर पुढे म्हणाले की, उद्याच्या पाकिस्तान विरुद्धचा सामना आपण खेळलो, तर आपल्याला साधा विजय नको, तर मोठा विजय हवा आहे. पाकिस्तानला केवळ हरवायचेच नाही, तर त्यांचा दारुण पराभव करायचा आहे.
संपादकीय भूमिकाहा सामना होणार आहे, याचे नियोजन काही मासांपूर्वीच झालेले आहे. तेव्हा खादर यांनी विरोध का केला नाही ? आता सामना काही घंट्यांवर असतांना अशा प्रकारचे विधान करून ‘आपण देशभक्त आहोत’ असा दाखवण्याचा प्रयत्न खादर करत आहेत, असेच कुणालाही वाटेल ! |