नवी देहली – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ३ जूनपासून टोल दरात ५ टक्क्यांनी वाढ केली आहे. प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी सांगितले की, टोल दरात प्रतिवर्षी वाढ करण्यात येत असते. आताची दरवाढ आधीच होणार होती; मात्र आचारसंहितेच्या काळात टोल दरात वाढ करू नये, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते.
NHAI hikes tolls by 5% from today
The annual revision of highway user fees, was expected to come into effect on April 1.
However, the hike was deferred due to the 2024 Lok Sabha elections.#Elections2024 #LoksabhaElections2024pic.twitter.com/n5Phw6SH19
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 3, 2024
यामुळे टोल दरवाढ निवडणूक काळात रोखण्यात आली होती. आता टोलच्या दरात ३ ते ५ टक्क्यांनी वाढ करण्यात येत आहे. देशभरातील १ सहस्र १०० टोल केंद्रावर टोल दरवाढ होणार आहे.