छत्रपती संभाजीनगरचे नवे पोलीस आयुक्त संदीप पाटील !

पोलीस आयुक्त संदीप पाटील

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून वर्ष २००६ च्या बॅचचे आय.पी.एस्. अधिकारी तथा विद्यमान विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील यांनी १ जून या दिवशी सकाळी पदभार स्वीकारला.

छत्रपती संभाजीनगरचे मावळते पोलीस आयुक्त मनोज लोहिया ३१ मे या दिवशी ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांना येथील ‘एम्.जी.एम्.’च्या रुख्मिणी सभागृहात आयोजित एका सोहळ्यात निरोप देण्यात आला.

या वेळी माध्यमांशी बोलतांना संदीप पाटील म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्याची औद्योगिक आणि आर्थिक राजधानी आहे. येथील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास विशेषतः जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यास माझे प्राधान्य राहील, तसेच भ्रष्टाचार, रस्त्यांवरील गुन्हेगारी, जातीय हिंसाचार यांच्या विरोधात माझी ‘झिरो टॉलरन्स’ची (शून्य सहनशीलतेची) भूमिका असेल.