पुणे – येथील हिंजवडी आयटी पार्कमध्ये इन्फोसीस, विप्रो, टाटा, महिंद्रा यांसारखी मोठी आस्थापने आहेत. या आस्थापनांमुळे या भागात जवळपास प्रतिदिनच वाहतूककोंडी होत असते. त्यामुळे येथे काम करणार्या सहस्रो कर्मचार्यांचे दीड ते अडीच घंटे वाया जातात. पावसाळ्यात तर समस्या आणखीच गंभीर होते. याच वाहतूककोंडीच्या त्रासामुळे जवळपास ३७ आस्थापने स्थलांतरीत झाली आहेत. आणखी अनेक आस्थापने स्थलांतराच्या मार्गावर असल्याची माहिती ‘हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन’ने दिली आहे. ‘आयटी आस्थापनां’च्या स्थलांतरामुळे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हिंजवडी ग्रामपंचायतीनेही याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अनुमाने १५० आस्थापने आहेत. तिथे जवळपास ५ लाख लोक काम करतात. हिंजवडीत दिवसाला १ लाख चारचाकी धावतात. प्रत्येक चारचाकी रस्त्यात दीड ते दोन घंटे रखडते. त्यामुळे लाखो रुपयांचे इंधन वाया जाते. शिवाय आस्थापनांची तासाला २५ डॉलरची हानी होते. (स्थानिक प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिका :
|