Prajwal Revanna Arrest : प्रज्वल रेवण्णा याला बेंगळुरू विमानतळावर अटक

प्रज्वल रेवण्णा

बेंगळुरू (कर्नाटक) – शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणी जर्मनी येथे पळून गेलेला प्रज्वल रेवण्णा भारतात परतला. बेंगळुरू विमानतळावर पोचताच त्याला कर्नाटक पोलिसांनी अटक केली. प्रज्वल रेवण्णा माजी पंतप्रधान एच्.डी. देवेगौडा यांचा नातू आहे.