सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा पहातांना सौ. मेघा जोशी यांना आलेल्या अनुभूती

११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या बह्मोत्सव सोहळ्याचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सौ. मेघा जोशी

ब्रह्मोत्सवाच्या कालावधीत यजमानांचे ३ मासांपूर्वीचे दुखणे अकस्मात् उद्भवणे

‘माझे यजमान श्री. वसंत जोशी (वय ६८ वर्षे) यांच्या छातीवर अनेक गाठी येत आणि काही दिवसांत जिरून जात असत. तज्ञांनी सांगितले, ‘‘हा गोळ्यांचा दुष्परिणाम आहे. घाबरण्याचे कारण नाही.’’ त्यांनी यजमानांच्या गाठींवर मलम लावायला सांगितले आणि काही वैद्यकीय चाचण्या करायला सांगितल्या. गुरुदेवांचा ब्रह्मोत्सव सोहळा झाल्यावर आम्ही वैद्यकीय चाचण्या करायचे ठरवले. यजमानांनाही बरे वाटून त्यांनी सोहळा पहायला येण्याची सिद्धता दर्शवली. त्यामुळे मी सेवा चालू केली.

११.५.२०२३ या दिवशी सकाळीच यजमानांचे शरीर थरथरायला लागले आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागले. माझा मुलगा (श्री. प्रसाद आणि सून सौ. अश्विनी) यांनी त्यांना रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी मला सांगितले, ‘‘तू सेवा कर. काळजी करू नकोस.’’

– सौ. मेघा जोशी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ६३ वर्षे)( १७.७.२०२३)

पू. पात्रीकरकाकांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यामुळे आणि त्यांनी आधार दिल्यामुळे उत्साहाने सेवा करता येणे आणि सोहळ्यातील आनंद अनुभवता येणे

पू. अशोक पात्रीकर

मी यजमानांच्या प्रकृतीविषयी पू. अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे संत, वय ७४ वर्षे) यांच्याशी भ्रमणभाषवर बोलले. त्यांनी मला यजमानांसाठी नामजपादी उपाय सांगितले आणि मला धीर दिला. तेव्हा माझ्या मनातील नकारात्मक विचार नष्ट झाले. पू. पात्रीकरकाकांनी त्यांच्या व्यस्ततेतही मला २ वेळा भ्रमणभाषवर संपर्क केला. त्यामुळे मला उत्साहाने सेवा करता आली आणि सोहळ्यातील आनंद अनुभवता आला.

‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) त्यांच्या प्रत्येक साधकाचा योगक्षेम वहातात’, हे मला प्रत्यक्ष अनुभवता आले’, त्याबद्दल मी गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. मेघा जोशी ( १७.७.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक