Ranchi Rape Case: झारखंडमध्ये सैनिकाच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार !

घटनास्थळ

रांची (झारखंड) – येथे भारतीय सैन्यातील एका सैनिकाच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. हा सैनिक सध्या लडाख सीमेवर तैनात आहे. बलात्काराची घटना रांचीतील पोखरटोली भागात घडली.

या महिलेची पोखरटोली येथे भूमी आहे. ती तिथे घर बांधत होती. तेथीलच एका घरात ती तिच्या ७ वर्षांच्या आणि ४ महिन्यांच्या मुलीसह रहात होती. २७ मे च्या रात्री १२ ते १ या वेळेत ४ तरुणांनी महिलेच्या घरात घुसून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणी घर बांधले जात आहे, तेथे काही स्थानिक तरुणांशी महिला आणि तिचा पती यांच्यात वाद झाला होता. या तरुणांनी घर बांधण्याचे कंत्राट त्यांनाच देण्याची मागणी केली होती. त्यानंतर हे कंत्राट त्यांना देण्यात आले होते; मात्र काम वेळेत होत नसल्याने कंत्राट काढून घेण्यात आले होते. यामुळे संतप्त तरुणांनी बलात्कार केला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

संपादकीय भूमिका

  • ‘देशातील बलात्कारांच्या घटना न थांबणे, हे स्वातंत्र्यानंतरच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
  • जनतेला धर्मशिक्षण न देणारे आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते या स्थितीला  उत्तरदायी आहेत !