महाराष्ट्राची उपराजधानीही असुरक्षित !
नागपूर – येथील डॉ. बाबासाहेब आंबडेकर आंतरराष्ट्रीय विमानतळ बाँबने उडवून देण्याच्या धमकीचा ई मेल ‘एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया’ला (‘एएआय’ला) मिळाला आहे. यानंतर विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून प्रवाशांसह सर्वच कर्मचार्यांची कसून चौकशी केली जात आहे. या प्रकरणी दंगल नियंत्रण पथक (क्यु.आर्.टी.), बाँब निकामी करणारे पथक (बी.डी.एस्.) आदी सर्वच यंत्रणांना २४ घंटे सतर्क रहाण्याचा आदेश देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच एका ई मेलद्वारे विमानतळ उडवण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा तसा ई मेल प्राप्त झाला आहे.