Delhi Bulldozer Action : देहलीमध्ये मशिदीचा अवैध भाग पालिकाने पाडला !

कारवाईच्या वेळी मुसलमानांकडून विरोध करत दगडफेक

नवी देहली – देहलीच्या मंगोलपुरी येथील मशिदीच्या अवैध बांधकामावर देहली महापालिकेने कारवाई केली आहे. मशिदीचे बेकायदा बांधकाम हटवतांना बराच गदारोळ झाला होता. या गदारोळात मशिदीचा अवैध भाग पाडण्यात आला, तसेच अन्य अवैध पाडण्यात आली. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुसलमानांकडून या कारवाईला विरोध करण्यात आला. या बांधकामांच्या विरोधात तक्रारी आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

पोलीस आणि पालिका कर्मचारी कारवाईच्या ठिकाणी पोचल्यावर मुसलमान महिला अन् पुरुष मशिदीवर चढले आणि त्यांनी कारवाईला विरोध केला, तसेच दगडपेकही केली. त्यांचा विरोध झुगारून मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडून टाकण्यात आला.

संपादकीय भूमिका

  • आधी अवैध बांधकाम करायचे आणि नंतर कारवाई केल्यास कायदा हातात घ्यायचा, अशा मनोवृत्तीचे धर्मांध मुसलमान !
  • ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणारे अशा घटनांच्या वेळी कुठे गायब होतात ?
  • अवैध बांधकाम होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी !