|
दुर्ग (छत्तीसगड) – येथे गायीच्या वासराचे छिन्नविछिन्न शिर सापडल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला. ‘हिंदु युवा मंच’ आणि ‘राष्ट्रीय बजरंग दल’ यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला. तसेच रात्री पोलीस ठाण्यालाही घेराव घालण्यात आला. या वेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. या वेळी झालेल्या हाणामारीत एक पोलीस निरीक्षक घायाळ झाला. या प्रकरणी पोलिसांचे म्हणणे आहे की, वासराचे शिर कुत्र्याने तेथे आणले होते.
या संदर्भात भिलाईचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सुखनंदन राठोड यांनी सांगितले की, सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे अन्वेषण केले जात आहे. वासराचे शिर प्रयोगशाळेत पडताळणीसाठी पाठवण्यात आले आहे.
संपादकीय भूमिका‘कुत्र्याने शिर आणून टाकले’, असे म्हटले, तरी वासराची हत्या करण्यात आली आहे, हे स्पष्ट आहे. याचा शोध पोलीस कधी घेणार ? छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते ! |