India Buy 26 Rafale Jets : भारत फ्रान्सकडून घेणार आणखी २६ राफेल लढाऊ विमाने !

भारतीय नौदलासाठी होणार वापर !

नवी देहली – भारत सरकार पुन्हा एकदा फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमाने विकत घेणार आहे. त्यासाठीच्या कराराची बोलणी याच आठवड्यात चालू होणार आहे. भारतीय नौदलासाठी २६ राफेल लाढाऊ विमाने विकत घ्यायची आहेत. हा व्यवहार जवळपास ५० सहस्र कोटी रुपयांचा आहे. यापूर्वी भारताने वायूदलासाठी फ्रान्सकडून ३६ राफेल लढाऊ विमाने खरेदी केली आहेत.

सध्या चीन हिंद महासागरामध्ये त्याचा वावर सातत्याने वाढवत आहे. त्यामुळे भारतीय नौदलाला अधिक सशक्त करण्याची आवश्यकता आहे. सध्या भारताकडे २ विमानवाहू युद्धनौका आहेत. त्यांच्यासाठीच राफेल विमाने घ्यायची आहेत.