२६ कोटी रुपये आणि ९० कोटी रुपयांच्या मालमत्तेचे दस्तऐवज जप्त !
नाशिक – शहरातील सुराणा ज्वेलर्स या सराफ व्यावसायिकाचे दुकान आणि डेव्हलपर्सचे कार्यालय येथे आयकर विभागाने २४ मे या दिवशी धाड घालून सलग ३० घंटे झाडाझडती घेतली. यात अनुमाने २६ कोटी रुपयांची रोकड, तसेच ९० कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तवेज जप्त करण्यात आले. नाशिक, नागपूर अन् जळगाव येथील पथकाच्या ५० ते ५५ अधिकार्यांनी ही कारवाई केली.
२६ कोटी रुपये मोजण्यासाठी आयकर अधिकार्यांना १४ घंटे लागले, तसेच फर्निचर तोडून त्यातील रक्कमही जप्त करण्यात आली.
काही महिन्यांपूर्वी कस्टम विभागाने विमानतळावरून सोने तस्करी करणार्या व्यक्तींना अटक केली होती. यातील काही आरोपींनी जप्त केलेले सोने नाशिक येथील व्यापार्यांना विकले होते. याविषयी ५ सराफ व्यावसायिकांची नावे समोर आली होती. आयकर विभागाने माहिती घेऊन धाड घातली.