दिव्य कार्य करी दिव्य विभूती । चला टिपूया त्यातील क्षणमोती !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी प्रत्येक कार्य आधी स्वतः करून त्यातील बारकावे अभ्यासले आहेत. कार्य सूत्रबद्धरित्या होण्यासाठी कार्यपद्धती घातल्या आणि मगच ते साधकांना शिकवले. त्यामुळे अनेक साधक विविध क्षेत्रांतील कार्य करण्यासाठी सिद्ध झाले आहेत. दिव्य कार्य हे दिव्य विभूतींच्या हातूनच घडत असते ! या दिव्य कार्यामधील छायाचित्र स्वरूपात टिपलेले काही क्षणमोती येथे दिले आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी जे शिकवले त्यानुसार साधना करून आपण जीवनाचे कल्याण करून घेऊया !

धर्मजागृती करणारे फलक प्रदर्शन

धर्मशिक्षण देणार्‍या फलकांमध्ये सुधारणा सांगतांना प.पू. डॉ. आठवले आणि शेजारी कु. अंजली क्षीरसागर (वर्ष २०१३)

आश्रमांची निर्मिती

वास्तूविशारद सौ. शौर्या मेहता यांच्याकडून बांधकामाविषयी माहिती जाणून घेतांना प.पू. डॉक्टर (६.६.२००४)

साधकांना सेवा परिपूर्ण करण्यास शिकवणे

मूर्तीच्या डोळ्यांत जिवंतपणा जाणवण्यासाठी ते कसे रंगवावेत ? याविषयी साधक मूर्तीकार श्री. रामानंद परब यांना सांगतांना (वर्ष २०२०)

आध्यात्मिकदृष्ट्या मौल्यवान वस्तूंचा संग्रह !

काशाच्या वाटीत आपोआप निर्माण झालेले अत्तर त्या वाटीसह कसे जतन करावे, हे कु. सोनल जोशी यांना सांगतांना (५.६.२००८)

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी मार्गदर्शन

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी माहिती देतांना समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु चारुदत्त पिंगळे (३१.५.२०१७)