8 Naxalite killed : गडचिरोली येथे ८ नक्षलवादी ठार !

नक्षलविरोधी कारवाई करतांना सुरक्षा दलाचे जवान

गडचिरोली – जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नारायणपूर जिल्ह्यात २३ मेपासून चालू असलेल्या नक्षल चकमकीत सैनिकांनी ८ नक्षलवाद्यांना ठार केले आहे. नक्षलग्रस्त भागातील या चकमकीनंतर सैनिक मुख्यालयात परतत आहेत. इंद्रावती नदीच्या पाण्याच्या प्रवाहातून वाट काढत सैनिक नक्षल्याचे मृतदेह आणि नक्षल साहित्य खांद्यावर घेऊन जात असतांना दृश्यांमध्ये दिसत आहे.

नारायणपूर अबूझमाड येथील सीमावर्ती भागातील रेकाव्याच्या अरण्यात चालू असलेली सैनिक आणि नक्षलवादी यांची चकमक संपली आहे. या कारवाईत नक्षलवाद्यांकडून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. दंतेवाडा, नारायणपूर आणि बस्तर या ३ जिल्ह्यांच्या संयुक्त सुरक्षा दलामुळे हे यश मिळाले आहे. या कारवाईत ३ जिल्ह्यांतील पोलीसही सहभागी झाले होते. हे संयुक्त ऑपरेशन होते. डी.आर्.जी, बस्तर फायटर आणि ‘एस्.टी.एफ्.’च्या ८०० सैनिकांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला होता. नक्षलवाद्यांना पळून जाण्याचा मार्गही नव्हता. आयईडी पेरल्यानंतर नक्षलवादी घनदाट अरण्यात लपून छुप्या पद्धतीने गोळीबार करत होते; पण सैनिकांनी त्यांचा सामना केला.

संपादकीय भूमिका : नक्षलवादाची समस्या समूळ नष्ट होण्यासाठी सरकार ठोस पावले कधी उचलणार ?