उच्च न्यायालयाने आदेश देऊनही रगाडा नदीत रेतीचे अवैध उत्खनन चालूच

वाळपई, २१ मे (वार्ता.) – रगाडा नदी ही म्हादई नदीची उपनदी आहे. या उपनदीचा कर्नाटकमध्ये पश्चिम घाटात उगम होतो आणि ती तांबडी सुर्ला येथील जंगलातून गोव्यात प्रवेश करते. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने राज्यशासनाला रगाडा नदीत अवैधरित्या चालू असलेल्या रेती नाला आळा घालण्याचा आदेश दिला होता; मात्र स्थानिकांच्या मते रगाडा नदीत तांबडी सुर्ला, साकोर्डा आणि धारबांदोडा येथे अजूनही अवैधरित्या रेतीचे उत्खनन चालूच आहे.

स्थानिकांच्या मते रगाडा नदीच्या रगाडो आणि जांबोली नाल्यांमध्ये रेतीचे उत्खनन मोठ्या प्रमाणावर केले जात आहे आणि यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. साकोर्डा येथील सातपाल आणि पणशीवाडा भागांमध्ये रेतीचे उत्खनन चालू आहे. यामुळे रगाडो आणि जांबोली नाले यंदा पूर्णपणे आटले आहेत. स्थानिकांच्या मते अवैध रेती उत्खननामुळे नदीची वहाण्याची दिशाही पालटली आहे. वन खात्याच्या वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक आर्. प्रेमकुमार यांनी रेतीचे उत्खनन भगवान महावीर अभयारण्याच्या कार्यक्षेत्रात येत असल्यास कारवाई करण्याच्या अनुषंगाने संबंधित ठिकाणी पथक पाठवले; मात्र नंतर पथकाने संबंधित ठिकाणे तपासली असता ती भगवान महावीर अभयारण्याच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर येत असल्याचे उपवनसंरक्षक आर्. प्रेमकुमार यांनी सांगितले. खाण आणि भूगर्भशास्त्र खात्याने संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.   उत्खन