प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ लेखक दादूमिया यांचे निधन

दादूमिया उपाख्य डॉ. दामोदर नेने

वडोदरा (गुजरात) – येथील प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ लेखक, स्तंभ लेखक, तसेच इतिहासाचे अभ्यासक दादूमिया उपाख्य डॉ. दामोदर नेने यांचे निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. ‘दादूमिया’ या नावाने त्यांनी स्तंभ लेखन केले. त्यांनी काही पुस्तकेही लिहिली आहेत. मराठी गुजरात, इंग्रजी आदी भाषांतून त्यांनी लिखाण केले आहे.