Bilaspur Muslims Attacked Hindu Youth: बिलासपूर (छत्तीसगड) येथे मुसलमान तरुणांकडून हिंदु तरुणाला अमानुष मारहाण !

रायपूर (छत्तीसगड) – राज्याच्या बिलासपूरमधील तालपार या मुसलमानबहुल भागात जीवनदीप सिंह नावाच्या हिंदु तरुणाला अरशद, नफीस, शोएब आणि राजा खान उपाख्य सज्जाद अली या तरुणांनी अमानुष मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली.  जीवनदीपच्या गळ्यातील तुळशीची माळ पाहून या तरुणांनी त्याच्यावर आक्रमण केले. या वेळी त्याची गाडीही फोडण्यात आली. ज्या भागात हे आक्रमण झाले, त्या तालपार भागाला स्थानिक लोक ‘मिनी पाकिस्तान’ म्हणतात. सर्व आरोपींना अटक करून नंतर जामिनावर सोडण्यात आले आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ३० वर्षीय जीवनदीप सिंह बिलासपूरमध्ये ‘ट्रॅव्हल एजंट’ म्हणून काम करतो. ६ मे या दिवशी त्याच्या मुलीचा वाढदिवस होता. याला जीवनदीप याने त्याच्या अनेक मित्रांना आमंत्रित केले होते. यांत आरिफ नावाचा एक मुसलमान मित्रही होता. आरिफ हा तालपार भागातील रहिवासी आहे. जीवनदीप रात्री आरिफला घरी सोडण्यासाठी गेला. तेथून परतण्यासाठी गाडी चालू केली असता तेथे उभ्या असलेल्या काही जणांनी हेडलाइटचा प्रकाश डोळ्यात पडल्याचे निमित्त करून त्याच्याशी भांडण काढले. अरशद, नफीस, शोएब आणि सज्जाद अली यांनी जीवनदीपला शिवीगाळ करण्यास चालू केले. त्यानंतर त्याला ‘हिंदू’ म्हणत लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. त्याच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली. कसेबसे जीवनदीपने स्वत:चा जीव वाचवला. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार प्रविष्ट (दाखल) केली.

संपादकीय भूमिका

बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात हिंदूंचाच जीव अल्पसंख्यांकांमुळे असुरक्षित आहे, याचे हे आणखी एक उदाहरण !