१. उत्तर दिशा ही ईशान्य दिशेच्या तुलनेत सूर्यापासून दूर असल्याने तेथे वाईट शक्तींचे कार्य प्रभावीपणे चालू असणे
‘उत्तर दिशा ही ईशान्य दिशेच्या तुलनेत सूर्यापासून दूर आहे. त्यामुळे सूर्याच्या अस्तित्वाचा, म्हणजेच त्याचा तेजाचा लाभ उत्तर दिशेला ईशान्य दिशेच्या तुलनेत अल्प होतो. त्यामुळे उत्तर दिशेला वाईट शक्तींचे कार्य प्रभावीपणे चालते. परिणामी उत्तर दिशेला क्षितिजाकडे पाहिल्यावर दाब जाणवतो.
१ अ. उत्तर दिशेच्या क्षितिजाकडे पाहून दाब जाणवण्यासंबंधीचे विश्लेषण : जेथे आकाश भूमीला टेकल्याचा भास होतो त्या काल्पनिक रेषेला ‘क्षितिज’, असे म्हणतात. उत्तर दिशेच्या क्षितिजाकडे पाहून दाब जाणवतो, याचा अर्थ क्षितिजाच्या ठिकाणी वाईट शक्तींचा प्रभाव अधिक आहे आणि क्षितिजापलीकडच्या क्षेत्रातही वाईट शक्तींचा वावर अधिक प्रमाणात आहे.
२. ईशान्य दिशा उत्तर दिशेच्या तुलनेत सूर्याच्या जवळ असल्याने तेथे वाईट शक्तींचा प्रभाव दिसून न येणे
ईशान्य दिशा उत्तर दिशेच्या तुलनेत सूर्याच्या जवळ आहे. ईशान्य दिशेवर सूर्याच्या शक्तीचा प्रभाव अधिक पडतो. त्यामुळे तेथे वाईट शक्तींना कार्य करणे कठीण जाते. सूर्यप्रकाशाचे अस्तित्व पुष्कळ प्रमाणात असल्याने ईशान्य दिशेला ईश्वरी चैतन्य अधिक प्रमाणात असते. त्यामुळे ईशान्येकडील क्षितिजाकडे पाहून हलकेपणा जाणवतो.
२ अ. ईशान्य दिशेच्या क्षितिजाकडे पाहून हलकेपणा जाणवण्यासंबंधीचे विश्लेषण : ईशान्य दिशेच्या क्षितिजापर्यंतची वाट वाईट शक्तींच्या त्रासापासून मुक्त आहे.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.२.२०२२)
|