भोपाळ (मध्यप्रदेश) येथील ‘हेमा’ हायर सेकंडरी स्कूल’मध्ये ‘तणावमुक्ती’ वर प्रवचन पार पडले !

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त प्रवचनाचे आयोजन

प्रवचनाला उपस्थित शिक्षक

भोपाळ (मध्यप्रदेश) – सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत येथील ‘हेमा (एच्.इ.एम्.ए. म्हणजे हेवी इलेक्ट्रकिल्स मलयाली असोसिएशन) हायर सेकंडरी स्कूल’ या शाळेत ‘तणावमुक्ती आणि संतुलित जीवन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा शाळेतील १०० हून अधिक शिक्षकांनी लाभ घेतला.

या वेळी सनातन संस्थेच्या सौ. संध्या आगरकर यांनी ‘तणावाची कारणे, त्याचे आपले शरीर आणि मन यांवर होणारे परिणाम, मनुष्याचे मन कसे कार्य करते ?, तसेच त्यावर गुणवृद्धी आणि साधना यांनी नियंत्रण कसे ठेवू शकतो ? नाम कसे घ्यावे ?’, यांविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती शर्मा यांनी केले. या कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या पूनम शर्मा यांचे चांगले सहकार्य मिळाले.